मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया



नमस्कार महाराष्ट्र 🙏,

सेवामॅनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि सेवा "Simplify" करून, योजनेच्या माहितीपासून ते योजनेचा लाभ मिळण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवतो.

आज आपण मुख्यमंत्री सहायता निधीबाबत (mukhyamantri sahayata nidhi) जाणून घेणार आहोत. या सेवेमार्फत आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य्य केलं जातं.

ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे असे घटक हे अर्थसहाय्य्य मिळवण्यासाठी पात्र आहेत.

हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवर उपचारासाठी हे अर्थसहाय्य दिलं जातं.

आता हे अर्थसहाय्य कसं मिळवायचं याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया. आपल्या सोयीसाठी आम्ही हि प्रक्रिया तीन भागात विभागली आहे.
१. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करणे.
२. ऑनलाईन अर्ज करणे.
३. कागदपत्रे जोडलेला अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात सादर करणे.

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कि अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतील.

१. तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पनाचा दाखला (उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे)
२. रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड (रेशन कार्डमध्ये रुग्णाचे नाव नमूद असणे गरजेचे आहे)
३. अर्जदाराचा अर्ज, हा अर्ज कसा लिहावा याचा नमुना खालीलप्रमाणे: 

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना
(mukhyamantri sahayata nidhi form pdf download)
४. रुग्णालयाच्या लेटरहेडवर वैद्यकीय खर्चाचं मूळ प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र आपल्याला रुग्णालयाकडून प्राप्त करवून घ्यायचं आहे. जर आपण खाजगी रुग्णालयात उपचार करत असाल आणि आपला उपचार खर्च १ लाखापेक्षा जास्त असेल तर या प्रमाणपत्रावर आपल्याला शासकीय रुग्णालयातील, जिल्हा शल्य चिकित्सक अर्थात सिव्हिल सर्जन यांचा सही शिक्का घ्यावा लागेल. याच प्रमाणपत्रामध्ये, सदर रुग्णाने राजीव गांधी जीवनदायिनी योजनेमार्फत कोणताही लाभ घेतलेला नाही असे नमूद करून घ्या. नमुना खालीलप्रमाणे:



६. रुग्णालयाकडून आपण अजून एक पत्र घेतो या पत्रात, रुग्णालयाच्या लेटरहेडवर, रुग्णालयाचे बँक अकाउंट डिटेल्स, आईएफएससी कोड, ई-मेल आयडी चा तपशील नमूद करवून घ्यायचा आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेचे जे अकाउंट आहे ते रुग्णालयाच्या नावावर असणे गरजेचे आहे, कोणत्याही वैयक्तिक अकाउंटवर अर्थसहाय्य दिलं जात नाही. नमुना खालीलप्रमाणे:



७. जर आपण अपघातावर उपचार करून घेत असाल तर अपघातबद्दल पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर अर्थात तक्रारीची प्रत जोडणे आवश्यक आहे.
८. किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसमध्ये रुग्णालयीन कमिटीचा रिपोर्ट आपल्याला जोडावा लागेल.
९. आमदार किंवा खासदार याचं शिफारस पत्र (जर आपल्याला शिफारस पत्र मिळत नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही कारण हि गोष्ट बंधनकारक नाही)

काही प्रमाणपत्रांचे नमुने आम्ही वर दिलेले आहेत, आपण रुग्णालयात जाऊन हे नमुना प्रमाणपत्र त्यांना दाखवू शकता आणि म्हणू शकता कि मला अश्याप्रकारचे प्रमाणपत्र आपल्या रुग्णालयाकडून हवे आहेत.

अर्थसहाय्य मिळवण्याच्या प्रक्रियेतील पहिला भाग म्हणजेच सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करणे पूर्ण झाला आहे. आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.



वेबसाईटवर जाऊन "ऑनलाईन अर्ज करा" हा पर्याय निवडा, हा पर्याय निवडल्यावर आपल्यासमोर एक फॉर्म प्रदर्शित होईल तो फॉर्म भरा. फॉर्म अगदी सोपा आहे, आपण तो सहजपणे भरू शकाल. 
फॉर्म भरून झाल्यावर तो सबमिट करा. या फॉर्मच्या दोन प्रिंट घ्या, एक जमा करण्यासाठी आणि एक आपल्या नोंदीकरिता.

आता या फॉर्मला आपण जमा केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडा.
आपला हा अर्ज आता आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला सादर करायचा आहे. सादर करण्याच्या दोन पद्धती आहेत, एकतर हा अर्ज आपण पोस्टाने पाठवू शकतो किंवा थेट जाऊन देऊ शकतो. जर आपण थेट जाऊन हा अर्ज जमा करणार असाल तर मंत्रालयात सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं कार्यालय आहे. जर आपल्याला पोस्टाने हा अर्ज पाठवायचा असेल तर कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे: 
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय, ७ वा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत, मुंबई-४०००३२ दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८

(असे लक्षात आले आहे कि, बऱ्याचदा ऑनलाईन अर्ज भरताना खूप अडचणी येतात अशावेळी आपण सगळी कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष येथे भेट द्यावी आणि ऑफलाईन पध्द्तीने आपला अर्ज जमा करावा. )

आपण अर्ज जमा केल्यानंतर, आपला अर्ज पडताळला जातो आणि सर्व माहिती बरोबर असल्यास आपल्या रुग्णालयाच्या बँक अकाउंटवर पैसे पाठवले जातात.
पैसे पाठविल्याची माहिती देणारं एक पत्र आपल्या रुग्णालयाला आणि आणि एक पत्र अर्जदाराला पाठवलं जातं.

अश्याप्रकारे आपण मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य मिळवू शकतो.

मुख्यमंत्री सहायता निधीबाबत आपले काही प्रश्न असतील तर ते कंमेंट्स मध्ये लिहा आम्ही आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.

आम्ही आशा करतो कि आमचा प्रयत्न आपल्याला आवडला असेल. शासनाच्या योजना आणि सेवा सोप्या पद्धतीत जाणून घेण्यासाठी सेवामॅनला नियमित भेट देत चला.

धन्यवाद !

विशेष सुचना : सेवामॅनच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या योजना सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो पण कोणताही व्यवहार करण्याआधी संबंधित योजनेची आणि सेवेची शहानिशा करूनच तो व्यवहार करा. आपल्याला झालेल्या/होणाऱ्या कोणत्याही तोट्यासाठी सेवामॅन जवाबदार राहणार नाही. 

150 comments:

  1. माझ्या वडिलांचे गुडघ्याचे ऑपरेशन करायचे आहे तर 50 हजार खर्च येईल तर आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळेल का.

    ReplyDelete
    Replies
    1. या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत दिलं जाणारं अर्थसहाय्य हे हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवरील उपचारासाठी दिलं जातं.
      अधिक माहितीसाठी पुढील लिंकला भेट द्या: https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/Arogyacomitee2_1.pdf

      Delete
    2. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८ वर संपर्क करून पहा.

      Delete
    3. Mazya dhonhi Dolyana keratoconus navacha aajar zala aahe. Tyamule mala disat nahi aahe .tyasathi 1.5 lak kharch yenar aahe. Tr mla ya yojnecha Labh Mikel ka?

      Delete
    4. उत्तर वरीलप्रमाणे.

      Delete
    5. रुग्ण आता हयात नाही 2 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं आहे बोन मॅरो करायचा होता टेस्ट झाली पण रिपोर्ट यायचा आधी निधन झाले. खासगी रुग्णालय होते बिल 1.52 लाख इतके झाले होते, आता काही मदत मिळू शकते कृपया मार्गदर्शन करा

      Delete
    6. यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण दवाखान्यात ऍडमिट असताना करावे का discharge मिळाल्यानंतरही केलं तर चालेल कळवावे

      Delete
    7. मि 26/6/2019 ला आर्जेन्टिना केला होता मला त्याची काहीही माहिती दिली नाही मि काय केले पाहिजे

      Delete
    8. Sir mala mukhyamantri sahayta nidhi form pahije please send pdf format

      Delete
  2. माझ्या आजीच्या गुडघ्याचे आॅपरेशन करायचे आहे 3 लाख खर्च सांगितला आहे तर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळेल का.

    ReplyDelete
    Replies
    1. या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत दिलं जाणारं अर्थसहाय्य हे हृदयशस्रक्रिया, किडणी, कर्करोग, मेंदु वरील उपचार, लिवर ट्रान्सप्लांट, अतिदक्षता विभागातील नवजात बालके तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारांवरील उपचारासाठी दिलं जातं.
      अधिक माहितीसाठी पुढील लिंकला भेट द्या: https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/Arogyacomitee2_1.pdf

      Delete
    2. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०२६९४८ वर संपर्क करून पहा.

      Delete
    3. Namskar sir mazya vadilansathi mi gelya mahinypurvi form v file banvun CM office la pathavli ahe parantu ajunhi kahi pratikriya milaleli nahi tar please anhala tyavishayi kahi mahiti milu shakate ka amchi file ka pass zali nahi te.thank you.

      Delete
  3. हि सह्यता महाराष्ट्र च्या बाहेरील हॉस्पिटल मध्ये उपचार
    घेतल्यास मिळते का

    ReplyDelete
    Replies
    1. https://cmrf.maharashtra.gov.in/hospapplinlist.action या लिंकवर दिलेल्या यादीनुसार असे दिसून येत आहे कि महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या हॉस्पिटलमधील उपचारावर मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत सहायता केली गेली आहे.

      Delete
  4. जर हॉस्पिटल त्यांच्या लेटर हेड वरती राजीव गांधीं जीवनदायी योजनेचा लाभ घेतला नाही असे लिहून देत नसेल तर अशावेळेस सर्व document क्लिअर असताना आणि राजीव गांधी व इतर कुठल्याही scheme चा उपयोग घेतला नसेल तर मला लाभ भेटू शकत नाही का

    ReplyDelete
    Replies
    1. आपण राजीव गांधी जीवनदायिनी योजनेचा लाभ घेतला नाही हे हॉस्पिटलने प्रमाणित केल्याशिवाय आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत मिळणाऱ्या मदतीचा लाभ घेता येणार नाही.

      Delete
  5. Discharge milalya nantar document submit Keli tar Chapel ka.

    ReplyDelete
    Replies
    1. चालेल पण यामध्ये आपल्याला खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे:
      १) मानक प्रक्रियेनुसार (स्टॅंडर्ड प्रोसिजरनुसार) आपण जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर हा अर्ज दाखल करावा. जितक्या लवकर आपण अर्ज दाखल कराल तितक्या लवकर आपल्याला मदत मिळू शकेल.
      २) आपण उपचाराचे पैसे दिल्याखेरीज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेत असाल तर यासंदर्भात हॉस्पिटल व्यवस्थापनाशी चर्चा करून, त्यांना तुमच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी केलेल्या अर्जाची आणि संपूर्ण प्रक्रियेची माहिती देऊन योग्य तो निर्णय घ्या.

      Delete
  6. माझा वडिलाचा किडनीचा उपचार चालु आहे.मला काही मदत मिळेल का.अर्थीक उत्तपन 1लाखा पेक्षा कमी आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. किडनीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत मदत केली जाते. पण, आपण इतर कोणत्याही योजनेअंतर्गत आधी लाभ घेतलेला नसावा.

      Delete
    2. सर राशन कार्ड व आधार कार्ड असताना राजीव गांधी योजनेचा लाभ मिळतो मग मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज का करेल हा केवळ लोकांची फसवणूक वाटते

      Delete
  7. Application kelyavar nidhi kadhi jama hoto

    ReplyDelete
  8. अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया:
    १. आपल्या प्रत्येक अर्जाला एक सांकेतांक दिला जातो.
    २. हे सर्व अर्ज वैद्यकीय सहायता समितीद्वारे पडताळले जातात.
    ३. अर्ज मंजूर झाल्यावर पैसे संबंधित हॉस्पिटलच्या बँक खात्यावर पाठवले जातात.

    या प्रक्रियेसाठी नेमका कालावधी किती लागतो हे सांगणे थोडेसे अवघड आहे पण सामान्यतः महिन्याभरात हि प्रक्रिया पुर्ण होते.

    ReplyDelete
    Replies
    1. सर किडनी रुग्णांना मेडिकल साठी खर्च का दिला जात नाही त्यांना तर खूप आवशकता आहे

      Delete
    2. जर एखाद्या हॉस्पिटल ची लिमीत 50000 हजार पण त्या ठिकाणी मला 200000 लागत असतील तर त्या साठी काय करावे

      Delete
    3. मला 2017 ते 2019 मध्ये ठाणे जिल्हा मध्ये कोण कोणास सहाय्यता निधी देण्यात आली ती लिस्ट भेटली तर बर होईल साहेब

      Delete
  9. Mazya mavashiche mankyatile majjatantu madhe gathiche operation zale ahe m s k Madhun madat milel k

    ReplyDelete
  10. मा.अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना ह्या योजनेतुन रूग्णांना निधी वितरणाचे कामकाज करित असल्याबाबत मन:पुर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  11. प्रमोद खंडागळे, निमगाव,ता:नांदुरा, जि:बुलढाणा ४४३४०४, मो.९४२२४९९५०७

    ReplyDelete
  12. Spine surgery sathi m s n run madat milel kay

    ReplyDelete
  13. maza mother CH thyroid ch operation ahe 50k kharch sagitla ahe mla M S Y tun madat hoil ka

    ReplyDelete
  14. मेंदु वरील पक्षाघात साठी आहे काय

    ReplyDelete
  15. गुडघ्याचा सांधेबदल उपचार खर्च या निधी अंतर्गत येतो का ?

    ReplyDelete
  16. Majhi 1:30 varshachi mulgi ahe tich spinal code CA operation jalh ahe tya sathi 1:50 lakh rupay kharch ala ahe tar Mala madat melel ka

    ReplyDelete
  17. मुख्यमंत्री सहायता निधी जास्तीत जास्त किती मिळू शकतो.

    ReplyDelete
  18. माझ्या वडिलांचे खुब्याची शस्त्रक्रिया करायची आहे.मला मदत मिळेल ना. व ती कशी मिळवू ते क्रुपया सांगा

    ReplyDelete
  19. Amhi Laxman kakasaheb Deshmukh, at post- Chanda, taluka- Newasa, dist-Ahmednagar, yancha 21 may 2018 roji Mukhyamantri sahayta nidhi Sathi application kele hote, tya sathi cha sampark kramank 9766056893 ha asun amhi ghetlela mahiti nusar amhala 7139 ha sandarbh kramank milala ahe. Tari ya number varti application chi sadyasthiti online uplabdh hot nahi, Tari hi ya vishayi amhala mahiti milavi, hi vinanti.

    ReplyDelete
  20. Mazya aae Che knee replacement zale aahe tyasathi yojnecha laabh milu shakto ka

    ReplyDelete
  21. Tumcha khup aabhari aahe.very great job thank you

    ReplyDelete
  22. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हाँस्पिटल ला पाठविण्यात आल्या नंतर किती कालावधी मध्ये शस्त्रक्रिया करावी तो निधी किती दिवस चालतो ३महीने,६महीने

    ReplyDelete
  23. मुख्यमंत्री वैद्यकीय साहायता निधी मिळवाण्यासाठी संपुर्ण कागदपत्र 27जुलै2018 ला onlin submit केले आहे तर किती दिवसाने hospital निधी जमा होईल

    ReplyDelete
  24. मी 20 मे ला पोस्टाने सर्व कागदपत्रे पाठवले आहेत. तरी काही अजून निधी आला नाही. पाठपुरावा कसा करायचा. तुम्ही चौकशी करू शकता. प्लीज र

    ReplyDelete
  25. 1 August la mukhymantri sahsahaya nidhi kaksh yete of lines document submit kele aahet ajunahi madat milali nahi kenvha milel please sanga

    ReplyDelete
  26. गर्भाशयाला मोठी गाठ असल्याने यावर उपचारासाठी १लाख खर्च केला आहे तर मदत मिळते का

    ReplyDelete
  27. सर्प दंश झालेल्या पेशंट ला रुपये 50000 खर्च येत असेल तर लाभ मिळेल का? कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  28. माझ्या मेहुणा यांच्या उपचारासाठी दि.27/07/2018 रोजी अर्ज केलेला आहे परंतु काही (मराठा समाज आरक्षण आंदोलन बंद व शेतातील कामे) कारणास्तव ओरिजनल फाईल अद्याप तेथे पोहच करू शकलो नाही महिना झाला आहे मात्र ऑनलाईन केलेले आहे मदत मिळेल का

    ReplyDelete
  29. मा महोदय, दि 25जून 2018 रोजी मा. आ. चैनसुखजी संचेती मलकापूर यांचे मार्फत नंदकिशोर भगवान वांजे निमगाव यांचा अर्ज CMRF कडे पाठविला आहे. रुग्णाचे Hip joint oppration करने अत्यंत आवश्यक आहे. त्यास असह्य त्रास असून आपणाकडून मिळणाऱ्या मदतीवरच त्याचे oppration अवलंबून आहे. अद्याप आपणाकडून मिळणाऱ्या मदतीची रुग्ण वाट पाहत आहे. आपणास नम्र विनंती कि सदरची मदत लवकर पाठवावी.

    ReplyDelete
  30. मा.महोदय,
    माझे वडील दिनांक 24 जुलै 2018 रोजी चक्कर येऊन पडले,डोक्याच्या मागच्या बाजूने त्यांना जखम झाली,सिटी स्कॅन केल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्या आणि acute sdh-cranitomy ऑपरेशन झाले आणि दवाखान्यात दिनांक 24-07-18 ते 22-07-18पर्यंत भरती होते एकूण खर्च रु.फक्त दवाखाना मेडिसिन,तपासणी वगळता रु 204690/-एवढा झाला आहे सर्व बिलाचे पैसे दिले आहे
    याबाबद मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत कशी,केव्हा,आणि काय करा लागेल

    ReplyDelete
  31. दिनांक 24,07,18 ते 22,08,18 भरती होते

    ReplyDelete
  32. माझ्या आईला अर्धांगवायूचा झटका आला असून तिच्यावर कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचार घेतले असून अंदाजे ८०००० रु. इतका करच झाला आहे. तर मला मदत मिळू शकते का?

    ReplyDelete
  33. 2 mahinyapasun arj dila aake madat kevha milel

    ReplyDelete
  34. पीएम फंड ऑनलाईन भरण्याची व्यवस्था नाही काय

    ReplyDelete
  35. Mazi bhachi nicu madhe admit ahe
    Tari maximum 4 lakh expenses sagitle ahet

    ReplyDelete
  36. Mazi aai overy cancer ne grast ahe pan mazi application reject zali ahe , cmf madhe cancer chya kuthalya types madhe medical help milte

    ReplyDelete
  37. Majya vadlanch accident zal ahe mala khup garaj ahe tar mala mukhyamantri sahayak nidicha labh milu shakel ka pls maji paristithi nahi tari pls mala madat kara

    ReplyDelete
  38. Operation karaych ahe tari pls madat kara

    ReplyDelete
  39. shvsan vikaravar cmrf madhun madat milel ka

    ReplyDelete
  40. नमस्ते सर माझ्या पत्नीचे हाताचे हाड मोडले आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत ऑपरेशन करून रॉड टाकला आहे, या योजनेतून मदत होईल का अंदाजे खर्च 130000 आला आहे

    ReplyDelete
  41. Major vadilache opreshn 1 mahony purvi zale rock panisse baron hospital new sagitle tumch nidhi retrieve fans Kartho nidhi Ayala pan part karat nahit

    ReplyDelete
  42. साहेब मी माझ्या आईवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना अर्ज केला होता तो निधी आता मंजूर झाला आहे पण आता आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे आणि आता हॉस्पिटलवाले पैसे देण्यासाठी नकार करत आहेत. मी त्याना डिसचार्जवेळेस तशी विनंती करून आलो होतो

    ReplyDelete
  43. माझा वडिलाचा अपघात झाला आहे
    850000 खर्च आला आहे
    माला मदत मिळेल का

    ReplyDelete
  44. Original documents lagtat ka zerox chalat naahit ka documents che

    ReplyDelete
  45. माझी समस्या अशी आहे की ज्या पेशंटला कर्करोगावर उपचार करायचा आहे त्यांच्याकडे आधारकार्ड आहे मतदारयादीत नाव आहे परंतु त्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही त्यामुळे उत्पन्नाचा दाखलाही मिळत नाही यावर काय पर्याय आहे

    ReplyDelete
  46. कुटुंब प्रमुखाचा सर्पदंशाने शेतात काम करताना मृत्यु झाला आहे. पूर्ण कुटुंबार आर्थिक संकट कोसळले आहे मदत मिळेल का?

    ReplyDelete
  47. सर माझ्या वडिलांची फाइल आहे त्यांची स्थिती काय आहे कारण त्याच्या फाइल चा क्रमांक माहित नाही तरी नावावरुन समजेल का

    ReplyDelete
  48. Mazha mulala Bronchopneumonia
    AajarAahe Tari tyala PICU Madhe14Divas Admeet kele Aahe mulache vay 15 mahine Aahe
    Tari mazhi Aarthik paristhi bikat aahe mala Cm Fandachi madatichi garaj Aahe

    ReplyDelete
  49. Deenanath mangeshkar hospital la operation kele tar 5 lakes che madat melte ka?He hospital govt. Ahe ke private

    ReplyDelete
  50. Mazhya mulache swasnalikeche operation karayche ahe tr tyache kontehi documents nahit tr mazhe document dile tr chalel ka kharch 100000 rupees ahe

    ReplyDelete
  51. how to sing the new hospital for cmrf

    ReplyDelete
  52. File no 11474 status babat mahit havi hoti.....

    ReplyDelete
  53. Bombay hospital madhe 3 yrs old mulgi burn zhali ahe treatment sathi 6 lakh rs expenses yenar ahe please help aaj amhi mantralayat Jamar ahot8976567722

    ReplyDelete
  54. सर माझ्याकडे फॉर्म भर्तनाचा सांकेतिक क्रमांक नाही आहे तर फक्त नावावरुन माझ्या फॉर्म ची update समजेल का किंवा त्या साठी आता काय करावं लागेल

    ReplyDelete
  55. माझ्या वडिलांना स्वाईन फ्लू हा आजार झाला होता त्यामधून त्यांची recovery झाली पण त्यांच्या treatment la जवळपास 4,00000 रुपये खर्च झाला तर यात माझी काही मदत होऊ शकेल का

    ReplyDelete
  56. saheb,,, knee Replaysment ke liye madat milti hai kya....

    ReplyDelete
  57. Ya yojanetun 100% labha milta ka? Manje tvarit paise jama hotat ka kiti kalavdhi paise jama honyas lagto

    ReplyDelete
  58. Online document jama nahi kru shkat ka mi

    ReplyDelete
  59. खूप छान माहिती कोणाला गरज पडल्यास अवश्य मदत घेऊत

    ReplyDelete
  60. मी माझे सर्व कागदपत्रे पत्राने पाठवत आहोत मला याची पोहोच मिळावी

    ReplyDelete
  61. Majhya bhavachya patniche. Hear valveche operation karayache aahe .majhya bhavachi aarthik paristhiti bikat aahe .madat milu shakel ka?

    ReplyDelete
  62. Sir nidhi kiti divsat milto

    ReplyDelete
  63. Please send me account details for cross check

    ReplyDelete
  64. Sucide farmer case la ha labh bhetu shkto ka

    ReplyDelete
  65. Majhya bhavchya patnichi file no.7966 dt.20 june 2019 la Jama keleli ahe Tari ajun kahich status miala nahi. Kadhi madat milel. Majhya bhavavhi arthik paristithi khupach bikat ahe. Sir pls..

    ReplyDelete
  66. रुग्ण हा इयत्ता 9 वी चा विद्यार्थी आहे मग उत्पन्न दाखला कुणाचा लागेल

    ReplyDelete
  67. सर आह्मी फ्रॉम जमा करून खूप दिवस जले पण काही झालं ने तर please Kay करावे

    ReplyDelete
  68. माझे काका 1 महिन्यापासुन ख्रिस्तानंद दवाखाना ब्रम्हपूरी येथे दाखल आहेत त्याचें आतडीला मोठे छीद्र पडुन पस पोटात पसरल्याने कीडनी काम करणे थांबले होते,करिता आपरेशन झाले ,औषधांचा खर्च नातेवाईकाकडुन मदत मागुन भागवला मात्र दवाखान्याचे बिल 1लाखापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे करिता मदत मिळावी .

    ReplyDelete
  69. हर्निया ऑपरेशन साठी मुख्यमंत्रीसहायता योजनेत मदत मिळते का

    ReplyDelete
  70. Maja balacha meandut rakth srav jala hota tyasathi aamhi magcha varshi mukysmntri shayatha nidhi sathi foam bharla hota pan ajun kahich replay nahi aala

    ReplyDelete
  71. Maja balacha meandut rakth srav jala hota tyasathi aamhi magcha varshi mukysmntri shayatha nidhi sathi foam bharla hota pan ajun kahich replay nahi aala

    ReplyDelete
  72. सर मला माझे वय ३७ वर्षे आहे माझा २००८साली अचानक ऐकायला येते बंद झाले आहे डॉक्टरांनी मला काॅककिलीअर इमपालानट सर्जरी करायला सांगितले आहे व सर्जरी नंतर १०० टक्के ऐकायला येईल अशी ग्वाही दिली आहे आणि त्या चार खर्च ७३०००० (सात लाख तिस हजार रुपये ) सांगितले आहे तर मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून किती अर्थ सहाय्य मिळू शकेल

    ReplyDelete
  73. मला पिताशयाचे व दोन्ही पायांचे varicose veins च्या शस्त्रक्रियेसाठी साहाय्य मिळेल का?

    ReplyDelete
  74. साहेब मी कर्करोगावर जर उपचार घेतोय पण, हाॅस्पीटल चे या उपचारवर किती खर्च आहे, असे पत्र नसेल तर कशी मदत मिळवायची, किंवा ती मिळते का

    ReplyDelete
  75. परंतु कर्करोग झाल्याचे सर्व पेपर आहेत, कारण मी मिलेटरी हाॅस्पीटल येथे उपचार घेत आहे

    ReplyDelete
  76. मि योगेश देविदास वाणी रा नाशिक मि अंपग असुन माझा पुतण्या वैभव विकास वाणी याला 30नोव्हेंबर ला चक्कर आली असता त्याला अपोलो दवाखान्यात अँडमिट केले होते त्यांनी मेंदुची शस्रक्रिया करण्यास सागितली आहे वत्याचा खर्च 15लाख सांगितले आहे माझा भाउ काँन्टक पद्धतीने कामाला जातो आमची परिस्थिती नाही सहकार्य मिळावे

    ReplyDelete
  77. Sir mazya aaichi breast cancer treatment sadhya solapur madhil solapur cancer center hospital madhe chalu aahe tyanche total kharch doctarani 3.5 lac sangitale aahe for total chemo to surgery. Tar mala kiti paryant nidhi milu shakto ani kiti divsat milel.... Plz

    ReplyDelete
  78. Sir karyalayala rojch call kart aho pn recieve ch krt nai koni me mazya vadilachi case dili hoti pn ajun mla kaich klalel nai kai upay suchva

    ReplyDelete
  79. Sir karyalayala rojch call kart aho pn recieve ch krt nai koni me mazya vadilachi case dili hoti pn ajun mla kaich klalel nai kai upay suchva

    ReplyDelete
  80. Online अर्ज यावयाचा आहे. परंतु सदर पेज ओपन होत नाही. काय करावे?

    ReplyDelete
  81. सर माझ्या आईला कॅन्सर आजार झाला आहे मी आईला घेऊन दवाखान्यात आहे मला मदतीची गरज आहे तुमची मदत हवी

    ReplyDelete
  82. मदतीची रक्कम किती दिवसात मिळते जर रुग्णालयात एक दोन दिवसात जमा करणेस सांगितले तर काय करावे त्यास कृपया पर्याय सांगा.

    ReplyDelete
  83. माझ्या नातेवाईकाचा अर्ज मी १५/०७/२०१९ला जमा केला होता परंतु त्याची मदत आज पर्यत झालि नाही
    औरंगाबाद

    ReplyDelete
  84. 1.5 year jale file submit karun ajun paise jama nahit yasti kay karave lagel

    ReplyDelete
  85. ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे का हे अर्ज आपण हॉस्पिटलमध्ये असलो तर करता येते का आणि ऑपरेशन झाल्यानंतर हे अर्ज करता येते का हे योजनाच्या आपल्याला लाभ भेटेल का

    ReplyDelete
  86. Cancer pidit rugn Dipak Ramchandra Kawade at Tumsar Dist Bhandara Yancha Fund Kadhi Midel Sanga sir

    ReplyDelete
  87. Mazaya baba che sagde documents oct 19 la pathvle aahyet teri ajun kahi update medali nahi, Customer supprot number pan phone nahi uchalat.
    please help.

    ReplyDelete
  88. The online tab not working when i click on that online tab it was not working, i.e. in disabled mode. Can you send me the actual side where i can apply online for relief fund.

    ReplyDelete
  89. My mother was admitted in Meditrina Institute of Medical Science Nagpur since from 6 Feb 2020 due to brainstorm i need a help form CMO office so that i can give proper treatment to my mother because my mother suffering from two major brain operation from the date of admission in hospital. Please help me so that i can put my request to CMO office for getting help. Thank you hope so you will provide me proper link

    ReplyDelete
  90. Namaskar sir majha palya 15 varshacha Asian tyala brain tumerchya operations athi 4 lakh kharch yetoy tar mala ya yojanetun kiti rs paryant sahayata bhetu shakat please reply sir.

    ReplyDelete
  91. नैसर्गिक आपत्ती मध्ये एखादी व्यक्ती मरण पावली असेल आणि त्याच्यावर अवलंबून असलेल त्याच कुटुंब जर आर्थिक विवंचनेत असेल तर अशावेळी सदर कुटुंब या योजनेचा लाभ घेवू शकते काय? तसेच ऑफलाईन अर्ज करण्यसाठी अर्जाचा नमुना पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिल्यास सर्वांचा फायदा होईल.

    ReplyDelete
  92. म.फुले योजनेचा लाभ घेता आसलेस मुख्यमंत्री साहायता निधी घेता येतो का

    ReplyDelete
  93. Namskar,
    MAzya mitrach Kidney transplantation karayche aahe, dr ne 12-15 lakh karch sangitala aahe,
    tar "मुख्यमंत्री सहायता निधी" marfat kiti madat rugnala milel.
    kahi samjel ka ?

    ReplyDelete
  94. यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण दवाखान्यात ऍडमिट असताना करावे का discharge मिळाल्यानंतरही केलं तर चालेल कळवावे

    ReplyDelete
  95. यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण दवाखान्यात ऍडमिट असताना करावे का discharge मिळाल्यानंतरही केलं तर चालेल कळवावे का

    ReplyDelete
  96. दि.2/3/20 रोजी रविंद्र बबनराव वानखडे ,वय-३८ रा.जांब ता.कारंजा ,जि.वाशिम यांना इलेक्ट्रीक चा मोठ्या प्रमाणात शाँक लागला आहे व ते नागपूर येथील म्युअर हाँस्पीटल मध्ये उपचार घेत आहे..डाँ. ने 10-12 लाख रू. खर्च असून पेशंटचे दोन्ही हात कट केले आहे..तसेच आर्थिक परीस्थिती खुप हालाकीची असुन शेती नाही फक्त मजूरीवर कुटुंब आहे ,वडिल नाही पेशंट स्वतः कुटुंब प्रमुख आहे.. आत्तापर्यंतचा खर्च लोकवर्गणीतुन केला आहे तरी क्रूपया या पेशंटला ताबडतोब आर्थिक मदत द्यावी ही विनंती
    मो.न - ९५७९८७६६३५

    ReplyDelete
  97. मला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करावयाचा आहे सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत परंतु सध्या चालू असलेल्या लॉक डाऊन मुळे मला मंत्रालयात येण्यासाठी खूप अडचण येत आहे काही पर्याय असल्यास सांगा plz

    ReplyDelete
  98. मेरा नाम राजेश प्रकाशचंद नानेटकर है, मैं पैर से विकलांग हूँ, मेरा पता खलाशी लाइन,शिव मंदिर के पास, मोहन नगर,नागपूर 440001 महाराष्ट्र ।
    फोन क्रमांक :- 9730900640
    माननीय मुख्यमंत्री जी,
    मेरी घर की परिस्थिति बहोत खराब है, मेरा काम भी छूट गया है, पास में पैसे भी खत्म हो गए है, मेरा बड़ा भाई मानसिक रोगी हैं, उसकी देखभाल की जवाबदारी मुझ पे ही है, मेरे माता पिता भी नही है, मेरी आर्थिकस्थिति बहोत ख़राब है।
    कृपया मुझे आर्थिक मदद कीजिये।
    ऐसी आपसे प्रार्थनीय विनंती हैं।
    धन्यवाद

    ReplyDelete
  99. माझे नाव अविनाश भारत गायकवाड मी निलज ता करमाळा जि सोलापूर येथील रहिवाशी असून मी 80%अपंग आहे माझे शिक्षण दहावी झालेलं आहे मी 2008 साली दहावी मध्ये होतो मला खुप शिकण्याची इच्छा होती पण पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा किलोमीटर जावे लागत होत आणि माझ्याकडे जाण्यासाठी साधन नसल्यामुळे मला शाळा सोडावी लागली मला माझे शिक्षण पूर्ण करायचं आहे छोटीशी नोकरीं करण्याची इच्छा आहे किंवा छोटासा हॅंडीकॅपटेड व्यवसाय करण्याची इच्छा आहे. पण मला घर सोडून मला कुठेही फिरायला येत नाही त्यामुळे मी गेली बारा वर्ष झाली मी घरीच बसून आहे. त्यामुळे मी खुप अडचणी त आहे मला माझ्या घरचे पण पाहत नाहीत त्यासाठी मला अपंग स्कूटर घेण्यासाठी आर्थिक साहाय्य करा त्यासाठी मला 65 हजार ते 70 हजार रुपये ची आर्थिक मदत हवी आहे माझा acound numbar 375301000696 आहे IFSC CODE ICIC0003753 आहे.माझा MO NUMBER 9527756181आहे मला मदत केली तरच माझ्या जीवनात बदल होतील नाहीतर माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही मला तुम्ही आर्थिक मदत करा किंवा तुम्ही दिली तरी चालेल कृपया मला मदत करा

    ReplyDelete
  100. खरंच सर मी खुप अडचणी त आहे मी खेडे गावामध्ये शेतांत राहत असल्या मुळे मला सरकारी योजनांची माहिती पण मिळत नाही माझ्या कडे UDID card पण नाही त्यामुळे मला समाज कल्याण कार्यालयामधून पण मदत मिळत नाही. UDID card काढण्यासाठी मला माझ्या घरचे सोलापूर ला येत नाही मला आर्थिक मदत केली तर मला माझ्या सोईप्रमाणे गाडी बनवता येइल तुम्ही दिली तरी चालले मला अर्थ साहाय्य केल तरी मी नक्की गाडी बनवेल कृपया मला मदत करा मला मदत केली तरच माझी लाईफ बनेल

    ReplyDelete
  101. Mazya mulache 8 year operation zale ahe nimonia (swara hospital).lockdown aslyamule mala form fill karta ala nahi.260000 kharch ala ahe.kay karave.

    ReplyDelete
  102. 6 महिने झालं आम्ही अर्ज दाखल केलाय अजुन आम्हाला कोणत्याही प्रकारचा reply nahi as ka?

    ReplyDelete
  103. लिवर ट्रांसप्लांट करायचे आहे.

    ReplyDelete
  104. नमस्कार सर
    माझा मिसेस ची 7व्या महिन्यात सिझरींग करावी लागली
    आणि बाळ प्रि मेच्युअर असल्यामुळे वजन 800 ग्राम होत त्यामुळे बाळ वेंटिलेटर वर होत आता नोरमल आहे पण अजुन NICU मधेच आहे त्याचा रुग्णालयाचा खर्च अंदाजे 3.लाख रु आहे तर मग आता सर्व डोक्युमेंटस डिस्चार्ज नंतर पाठवली तर चालेल का आणि आम्हाला या योजनेतुन मदत मिळेल का

    ReplyDelete
  105. आदरणीय मुख्यमंत्री साहेब
    मी भगवंतराव गंगारामजी आसोल‌‌कर
    बेलोरा ता चांदूर बाजार ‌जी अमरावती
    महाराष्ट्र ४४४७०४ m no 9975884176 7387456035

    साहेब
    मी मुख्यमंत्री सहायता निधि साठी फाइल पाठवली असुन मला हार्ट अटैक या आजारासाठी नीधी प्राप्त करण्यात यावा ही वीनंती

    ReplyDelete
  106. आता सध्या कोणत्या पध्दतीने आम्ही निधी मिळवू शकतो

    ReplyDelete
  107. सर मला मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा फॉर्म पाहिजे आहे
    मी काही केल्या हे फॉर्म मला कुठेच मिळत नाहीये प्लीज सर फॉर्म pdf मध्ये पाठवा

    ReplyDelete
    Replies
    1. Sir mazya pappa ch cancer che operation zal aahe 6 mahine zal paise miltil ka?

      Delete
  108. सर माझ्या वडिलांना किडनी प्रॉब्लेम मुळे डायलिसिस करावं लागलं आहे मी कागदपत्रे तयार करून ठेवले आहे पण करोना मुळे नाशिक वरून मुंबई ला येन शक्य होत नाही आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे व्याजाने पैसे काढून दवाखाना केला आहे plz सर काहीतरी उपाय सांगा खूप उपकार होतील
    9764625717

    ReplyDelete
  109. माज्या वडिलांना 02-06-2020 रोजी अहमदनगर यथे लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी ची सगळी प्रोसिजर पूर्ण केली पण लॉक डाउन असल्यामुळे फाईल घेऊन येणे शकय झाले नाही पण नंतर मंत्रालय मध्ये जाऊन फाइल जमा केली पण नंतर त्यांच्या ऑफिस मधून रिप्लाय आला की डिस्चार्ज नंतर फाईल जमा झाल्याने फाईल नामंजूर करण्यात आली आहे .सर आत्ता काय करू शकतो सगळे बंद होते येणे कासकाय शकय आहे सर plz काही तरी मदत करा
    प्रशांत पालवे अहमदनगर
    9860479302
    फाईल नंबर-3096/2020

    ReplyDelete
  110. सर माझ्या वडिलांचा covid19 मध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्या वरील उपचार खाजगी रुग्णालयात करत होतो त्यासाठी आम्ही कर्ज काढून हा सर्व खर्च उचला आहे आम्हाला मुख्यमंत्री सहाय्यता मिळण्यासाठी काय करावे लागेल कृपया आपण मार्गदर्शन केले तर खूप मदत होईल आमची आर्थिक स्थिती बेताची असल्याने कर्ज रक्कम साठी हातभार लागेल
    साजिद कचरू शेख
    श्रीगोंदे अहमदनगर
    8446733248

    ReplyDelete
  111. Sir
    Mazaya bhava che sagle documents jan 20 la pathvle aahyet teri ajun kahi update melali nahi, Customer supprot number pan phone nahi uchalat.
    please help

    ReplyDelete
  112. Sir
    Maza bhau ( rahul baban pawar) che sagle documents jan 20 la pathvle aahyet teri ajun kahi update melali nahi, Customer supprot number pan phone nahi uchalat.
    please help

    ReplyDelete
  113. Sir ,
    Mazya vadilanchi (Bhimrao kisan Chavan ) yanchi anjioplasti jhali ahe . Arthik dusrya mla ya yojnecha labh ghenyasathi mla margdarshan kra

    ReplyDelete
    Replies
    1. Mob.no 9834846357 son of bhimrao kisan chavan

      Delete
  114. महोदय,
    माझ्या आईचा मृत्यू कोविड-19 या आजाराने झाला होता. तरी तिचा खाजगी दवाखाना खर्च एकूण रुपये 1,50,000/- एवढा झालेला असून करिता हा खर्च मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत मिळू शकतो का कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  115. Other state la eye operation zale asta mukhyamantri madat milu shakate ka

    ReplyDelete
  116. 2 lak kharch aala asel tar ki madat milu shakate

    ReplyDelete
  117. सर,माझ्या आईला खाजगी दवाखान्यात कोविड १९ साठी १६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २० कालावधीत १७५०००/-इतका खर्च आला आहे.पिवळे BPL रेशनकार्ड आहे. मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधुन मदत मिळणेसाठी काय करावे लागेल, मार्गदर्शन व मदत मिळावी. माझा संपर्क कं. ८४८३९४४८४९

    ReplyDelete
  118. अर्धांगवायूचा आजारासाठी उपचारासाठी शासनाची काही मदत मिळते का किंवा एखादी योजना असेल तर प्लीज सांगा 9172886506 आता पर्यंत 300000 लाख रुपये जवळ पास गेले पण येथून पुढे उपचारासाठी पैसे नाहीत तर प्लीज सहकार्य करा

    ReplyDelete
  119. Blood cancer & bone marrow cancer sthit kahi help milu shakteka????

    ReplyDelete
  120. Please reply mi .. My mail id.
    raul.pr.pr@gmail.com

    ReplyDelete
  121. रुग्णाला,दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळाल्या नंतर ही उपचार चालू असताना या निधीतून लाभ मिळू शकतो का

    ReplyDelete
  122. अपघातात पायाचा हाड तुटलेल्या रुग्णाला,दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळाल्या नंतरही उपचार चालू असताना या निधीतून लाभ मिळू शकतो का. कृपया सांगा - 📞 7720805219

    ReplyDelete
  123. माझ्या भावाला b cell acute lymphoblastic leukemia झाला आहे.आमचे वार्षिक उत्पन्न १००००० पेक्षा कमी आहे आणि आता माझा भाऊ हॉस्पिटल मध्ये under treatment आहे तर त्याला मुख्यमंत्री सहायता निधितून मदत मिलू शकते का? आणि जर भेटत असेल तर किती कालावधि लागेल.

    ReplyDelete
  124. वडीलांच्या मणक्याचे ऑपरेशन करायचे आहे काही मदत मिळेल का?

    ReplyDelete
  125. यकृत पूर्णपणे खराब झाले आहे,घरातील व्यक्ती दान देऊ इच्छितो परंतु आर्थिक सहाय्य किती मिळेल हा प्रश्न भेडसावत आहे, कृपया अंदाजे सहाय्य रक्कम कळावे

    ReplyDelete
  126. जीवनदायी योजनेत mri पेट स्कॅन इतर स्कॅन होत नाही व महागड्या गोळ्या भेटत नाही म्हणून मुख्यमंत्री निधी चा जीवनदायी योजनेशी तुलना न करता रुग्णांना आर्थिक मदत करा जेणेकरून रुग्ण चांगले औषध घेऊ शकेल व आवश्यक स्कॅन करू शकेल

    ReplyDelete

Powered by Blogger.