स्वस्तातली सायकलवरची वॉशिंग मशीन पाहिलीत का?

 

        SpinCycle/Facebook


अमेरिकन तरुण रिचर्ड हेविट याने तयार केलेले हे उपकरण  स्पिनसायकल (Spin cycle) या नावाने ओळखले  जाते. २०१० मध्ये रिचर्ड जेव्हा सामाजिक कार्यासाठी आफ्रिकेतील बुरुंडी या देशामध्ये गेला असताना त्याने तेथील एका अनाथाश्रमात सुमारे 30 मुलांचे कपडे हाताने धुतले. लोकांना हाताने कपडे धुवावे लागू नयेत यासाठी त्याला मार्ग काढायचा होता आणि या गरजेतून जन्म झाला 'स्पिनसायकल' चा. हे उपकरण विकसनशील देशांमध्ये वेळ, ऊर्जा आणि पाण्याची बचत करण्यासाठी उपयोगाचे ठरत आहे. 


स्पिनसायकलचा वापर करणे फार सोपे आहे. सायकलच्या मागे असलेल्या ड्रममध्ये कपडे, पाणी आणि डिटर्जंट टाका, ड्रमचे झाकण बंद करा आणि सायकलचा वापर करणं सुरु करा. सायकल वापरात असताना हा ड्रम फिरतो. सुमारे दहा मिनिटानंतर आतील पाणी काढून टाका आणि त्यात स्वच्छ पाणी भरा. आणखी दहा मिनिटे सायकल चालवा. त्यानंतर कपडे काढून, पिळून, वाळू घाला. 


स्पिनसायकल ला तुम्ही एका जागी ठेऊन वापरू शकता किंवा तिला सायकलच्या मागे लावून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून नेऊ शकता. 


या कमालीच्या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. 

No comments:

Powered by Blogger.